
cinematic
प्रत्येक मोगऱ्याच्या कळीला
Akash Ukali
0 me gusta3:282 abr 2026
Prompt
प्रत्येक मोगऱ्याच्या कळीला प्रत्येक मोगऱ्याच्या कळीला तिच्या केसातला गजरा होता आला नाही, काही सुगंधांना आयुष्यभर तिच्या घराचा रस्ता सापडला नाही। चांदण्यांनी रात्र सजवली होती तिच्या खिडकीत उजेड मावला नाही, मनाने कितीदा हाक दिली पण तिच्यापर्यंत आवाज पोहोचला नाही। हातात शब्द खूप होते पण ओठांवर एकही येऊ शकला नाही, प्रेम मनात पूर्ण उगवल होत पण जगासमोर कधी फुलला नाही वाट पाहत राहिलं मन वेळ मात्र कधीच थांबला नाही, प्रत्येक मोगऱ्याच्या कळीला तिच्या केसातला गजरा होता आला नाही।