महाराष्ट्राचें वारश
cinematic

महाराष्ट्राचें वारश

Smita Investment/ SagarP

0 Gefällt mir3:1828. Okt. 2026

Erstellt mit HeartMuLa

Mach einen Song wie diesen

Mach aus einem Namen, einer Erinnerung oder deinem eigenen Text in wenigen Minuten einen Song.

Als Geschenk

Prompt

निळ्याशार सागराला, किनाऱ्यांची साथ, नारळीच्या वनराईत, खुलते सुंदर वाट! गणपतीपुळ्याच्या वाळूत, भक्तीचा सुवास, कोकणच्या प्रत्येक क्षणात, आनंदाचा सहवास! सह्याद्रीच्या कुशीत, स्वराज्याचा हुंकार, शिवरायांच्या पराक्रमाचा, इतिहास अपार! गडकोटांच्या माथ्यावर, भगव्याचा अभिमान, महाराष्ट्राच्या मातीला, शौर्याची शान! दगडांत कोरली कला, इतिहासाचा ठेवा, अजिंठा-वेरूळच्या वैभवाचा, जगभर दरवळे ठेवा! लेण्यांच्या या विश्वामध्ये, कलेचा सन्मान, महाराष्ट्राच्या वारशाची, जगभर ओळख महान! वनराईत वाघाची चाल, मेळघाटाचा साज, निसर्गाच्या कुशीत खुलतो, हिरवाईचा ताज! दीक्षाभूमीचा विचार, समतेचा आधार, मानवतेच्या वाटेवर, ज्ञानाचा जयजयकार! वारीच्या पावलांत विठ्ठल, टाळांचा गजर, पंढरीच्या वाटेवर, भक्तीचा सागर! भवानी मातेचा आशीर्वाद, अंबाबाईचा आधार, महाराष्ट्राच्या भक्तीमध्ये, श्रद्धेचा जयजयकार! संस्कृतीचा अभिमान, निसर्गाचे वरदान, महाराष्ट्राच्या भूमीला, करूया शतशः प्रणाम!